अमेरिकेतील एका लिलावामध्ये १९९५ साली प्रदर्शित झालेल्या पिक्सर अॅनिमेशन स्टूडिओच्या ‘टॉय स्टोरी’ चित्रपटाचे पोस्टर तब्बल २२ लाख ४० हजार रुपयांना विकले गेले आहे. या पोस्टरच्या लिलावाची सुरुवात २५ हजार डॉलर म्हणजेच १७ लाख ९३ हजार रुपयांपासून झाली होती. ‘Nate D Sanders’ या लिलाव हाउसने त्यांच्या वेबसाईटद्वारे या पोस्टरची विक्री ३१ हजार २५० डॉलरला झाली असल्याचे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवड्यात ‘टॉय स्टोरी’ या चित्रपटाचे हे पोस्टर विक्रिसाठी ठेवण्यात आले होते. या पोस्टवर चित्रपटातील मुख्य पात्र वुडी आणि बज आहेत. तसेच 24×36 इंचाच्या या पोस्टरवर अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांची स्वाकक्षरी आहे. त्यांच्या स्वाकक्षरीमुळे हे पोस्टर खास झाले आहे.

स्टीव्ह जॉब्ज यांची स्वाकक्षरी असलेले हे दुसरे पोस्टर आहे. या पोस्टरचा लिलाव करण्यात आला आहे. याआधी स्टीव्ह जॉब्ज यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नेटवर्ल्ड एक्सपो पोस्टरवर स्वाकक्षरी केली होती. हे पोस्टर २०१७ मध्ये १९ हजार डॉलर म्हणजेच १४ लाखांना विकले गेले होते.

‘टॉय स्टोरी’ या चित्रपटाची निर्मिती पिक्सर अॅनिमेशन स्टूडिओने केली आहे. स्टीव्ह जॉब्ज हे पिक्सर स्टूडिओचे अध्यक्ष असून प्रमुख शेअर होल्डर होते. पिक्सर स्टूडिओद्वारे निर्मिती होणारा हा पहिला अॅनिमेटेड चित्रपट होता. या चित्रपटाला जगभरात चांगला प्रतिसाद मिळाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This animated movie poster is sold at 22 lakh rupees avb