टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकल’ या आगामी सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरची खास गोष्ट म्हणजे यामध्ये टायगर दिसत नसून नवाजुद्दीन सिद्दीकी दिसत आहे. नवाजला या पोस्टरमध्ये कलरफूल दाखवण्यात आले आहे. आपल्या अफलातून अभिनयासाठी ओळखला जाणारा नवाजुद्दीन ‘मुन्ना मायकल’मध्ये डान्स करतानाही दिसणार आहे. याआधी त्याने कोणत्याही सिनेमात डान्स केला नव्हता. त्यामुळेच या सिनेमात त्याचा कसा डान्स करेल याची उत्सुकता नक्कीच त्याच्या चाहत्यांमध्ये असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांकाच्या ड्रेसवर काय म्हणाली सनी लिओनी

काही दिवसांपूर्वी आपल्या भूमिकेबद्दल सांगताना नवाजुद्दीन म्हणालेला की, या सिनेमात मी डान्स करताना दिसेन. हा सिनेमा स्वीकारण्याचं मुख्य कारण हेच होतं की मला यात डान्स करायचा होता. मी स्वतः सिनेमात डान्स करायला घाबरतो. माझ्या मनातील भीतीवर मात करण्यासाठी मी हा सिनेमा स्वीकारला आहे. सिनेमात तर सोडाच पण खासगी आयुष्यातही मला कोणी डान्स करायला सांगितला तर मी घाबरतो. इतर कलाकार किती सहजरित्या स्क्रिनवर डान्स करू शकतात याचा मी अनेकदा विचार करत असतो.’

शब्बीर खान दिग्दर्शित ‘मुन्ना मायकल’ हा सिनेमा येत्या २१ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबतच निधी अग्रवाल आणि रोनित रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमातून निधी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. टायगरच्या या सिनेमाला भारतातील पहिला डान्स अॅक्शन सिनेमा असेही म्हटले जाते.

हा सिनेमा टायगरसाठी फार खास आहे. या सिनेमातून तो मायकल जॅक्सन आणि वडील जॅकी श्रॉफ यांना सन्मानित करणार आहे. सिनेमात जॅकीसाठी खास गाणे बनवण्यात आले असून त्यासाठी वेगळी कोरिओग्राफी करण्यात आली आहे. टायगरने याआधी मायकल जॅक्सनला त्याच्या नृत्यातून आदरांजली वाहिली आहे. ‘हिरोपंती’ या सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केलेला टायगर आपल्या नृत्यकौशल्यावर आणि अभिनयावर सतत मेहनत घेताना दिसतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger shroff movie munna michael nawazuddin siddiqui poster out