मराठी चित्रपटसृष्टीतील ‘मँगो डॉली’ म्हणजे अर्थात अभिनेत्री उर्मिला कोठारे. अभिनय आणि नृत्यकौशल्याची उत्तम सांगड उर्मिलाने घातली आहे. उर्मिलाचं जितकं अभिनयावर प्रेम आहे, तितकंच नृत्यावरही. ती एक उत्तम कथ्थक नृत्यांगना असून अनेक वेळा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. मध्यंतरी उर्मिलाचं एक फोटोशूट चांगलंच चर्चेत आलं होतं. विशेष म्हणजे या फोटोशूटसाठी ती तब्बल पाच तास हवेत तरंगत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्मिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून अनेकदा ती डान्सचे, तिच्या मुलीसोबतचे किंवा तिच्या फोटोशूटचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामध्येच काही काळापूर्वी उर्मिसाने एरियल स्लिक फोटोशूट केलं होतं. तिच्या या फोटोशूटची त्यावेळी प्रचंड चर्चा रंगली होती. ही चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे या फोटोशूटसाठी उर्मिला चक्क ५ तास हवेत लटकत होती.


‘एरियल सिल्क’ हा एक नृत्य प्रकार असून उर्मिलाला नृत्याची विशेष आवड असल्यामुळे तिने या प्रकारात फोटोशूट केलं. या फोटोशूटसाठी तिने फिटनेस ट्रेनर अदिती देशपांडे हिच्याकडून व्यवस्थिती प्रशिक्षण घेतलं होतं.

दरम्यान, उर्मिला कोठारे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ‘दुनियादारी’, ‘ती सध्या काय करते’, ‘शाळा’ या चित्रपटांमध्ये झळकली आहे. तसंच तिने काही हिंदी आणि मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urmila kanitkar birthday special actress was hanging 5 hour in air ssj