‘राधा प्रेम रंगी रंगली’ ही नवी मालिका लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे. या मालिकेद्वारे तब्बल १३ वर्षांनंतर सचित पाटील छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, वीणा जगताप त्याच्या नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेची कथा राधा आणि प्रेम या दोघांभोवती केंद्रित असून ही एक प्रेमकथा असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : सेटवर दिग्दर्शकाने त्रास दिल्याचा अभिनेत्रीचा खुलासा

सध्या हिंदी सिनेमासृष्टीतील बरेचसे गायक मराठीतील मालिकांचे शीर्षक गीत गात आहेत. पिंगा, समझावा, राधा असं म्हणत संपूर्ण भारताला वेड लावणारी गायिका श्रेया घोषालने ‘राधा प्रेम रंगी रंगली’चे शीर्षक गीत गायले आहे. तसेच, गायक स्वप्नील बांदोडकरनेदेखील श्रेयाला उत्तम साथ दिली आहे. तर, हे गीत सुंदरप्रकारे प्रेक्षकांच्या समोर सादर करण्याची जबाबदारी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘व्हेंटिलेटर’ फेम लेखक आणि दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी पेलली. या मालिकेच्या दिग्दर्शनाच्या निमित्ताने राजेश मापुसकर छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत.

वाचा : सुश्मिताने शेअर केलेला फोटो पाहून फॉलोअरने घातली लग्नाची मागणी

मालिकेच्या शीर्षक गीताला राजेशजींची एक वेगळीच दृष्टी लाभली आहे. मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये भव्यता, नाविन्यता तर आहेच पण ‘प्रेम’ या भावनेला ते विविध छटांतून प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. राधा प्रेमच्या प्रेमामध्ये रंगली हे प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी केलेला रंगाचा सुंदर उपयोग, राधाचे स्वप्नमय जग आणि त्यामध्ये असणारा नायक प्रेमचा वावर, त्याने राधाला हळूच रंग लावणे, आणि मग त्या रंगामध्ये राधा संपूर्णपणे न्हाऊन जाणे हा क्षण खूप सुंदर आणि रोमॅण्टिक पद्धतीने राजेश यांनी त्या गाण्यामध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये प्रेक्षकांची भेट राधा आणि प्रेम बरोबरच मालिकेमधील इतर कलाकारांसोबत देखील होणार आहे.

‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेचे शीर्षक गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ventilator fame director rajesh mapuskar will direct radha prem rangi rangili serial title song