X
X

अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल, मॉडेलवर अत्याचार आणि मारहाण करणाऱ्या प्रोडक्शन मॅनेजरला अटक 

READ IN APP

न्यायालयात हजर केले असता २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली

२८ वर्षीय मॉडेल तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करणाऱ्या प्रोडक्शन मॅनेजरला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने मॉडेलचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढले होते. ज्याच्या आधारे आरोपी मॉडेलला ब्लॅकमेल करत होता. पोलिसांनी प्रोडक्शन मॅनेजर एकलव्यसिंग धर्मवीरसिंग तक्षक(२७) याला अटक करून न्यायालयात हजर केले असता २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

तरुणी हि तिच्या कुटुंबियांसोबत अंधेरी परिसरात राहते. एक वर्षांपूर्वी तिची आरोपीशी ओळख झाली होती. तिने काही हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. आरोपीने आपण प्रोडक्शन मॅनेजर असून एक शॉर्ट फिल्म तयार करत आहोत यासाठी अभिनेत्री म्हणून संधी देऊ अशी बतावणी करीत मॉडेल तरुणीची निवड केली.

शुटिंगसाठी हरियाणामधील रोहतक येथे गेले असता त्यांच्यात शाररिक संबंध निर्माण झाले. आपलं पितळ उघडं पडू लागल्यानंतर आरोपीने अश्लील व्हिडिओ आणि फोटो दाखवून ब्लॅकमेल करत मारहाण केल्याचा आरोप आहे.आरोपी वारंवार तरुणीला शाररिक आणि मानसिक त्रास देऊ लागला.

अखेर त्रासाला कंटाळून तरुणीने वर्सोवा पोलीस ठाण्यात एकलव्यसिंग याच्याविरोधात तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी एकलव्यसिंग विरोधात मारहाण, बलात्कार सह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला. शनिवारी पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आला.

23
X