रिकॅलीब्रेशन न करणाऱ्या रिक्षा टॅक्सीवर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उभारला असतानाच, नूतनीकरण न करणाऱ्या, टॅक्स न भरणाऱ्या आणि अशा विविध गोष्टीमध्ये दोषी आढळलेल्या २६०० टॅक्सींचे परवाने रद्द करण्याच्या कारवाईला प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) ताडदेव कार्यालयाने सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत १००० पेक्षा जास्त टॅक्सीचालकांना यासंदर्भातील नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टॅक्सीचालकाने परवान्याच्या विहित मुदतीनंतर जास्तीत जास्त सहा महिन्याच्या आत नूतनीकरण करणे गरजेचे असते. पण ‘चलता है’ ची भूमिका घेऊन परवान्याविना, कर न भरता, फिटनेस प्रमाणपत्राशिवाय व इतर अनेक नियम धाब्यावर बसवून टॅक्सीचालक टॅक्सी चालवत असतात. अशा टॅक्सीचालकांना चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने नोटीसा बजावल्या आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-12-2012 at 02:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2600 taxi licence will going to cancel