वैद्यकीय निष्काळजीपणाच्या तक्रारी ऐकण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत ३१ मार्चपर्यंत अधिसूचना काढावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले, तर डॉक्टरांना केल्या जाणाऱ्या मारहाणीप्रकरणी नव्या डॉक्टर सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत दोन आठवडय़ांत परिपत्रक काढण्याचे आदेशही न्यायालयाने शुक्रवारी अतिरिक्त गृहसचिव व पोलीस महासंचालकांना दिले.
सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरला झालेल्या मारहाणीप्रकरणी न्यायालयाने स्वत:च दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या तक्रारी ऐकण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याबाबतची सूचना न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेस राज्य सरकारला केली होती. ती स्थापन करण्याची तयारी राज्य सरकारने दाखवत त्यासाठी वेळ देण्याची विनंती केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assault on doctors ask cops to use special act hc tells govt