मुंबईतील गोरेगाव परिसरात आज सकाळी एका धावत्या बेस्ट बसला आग लागली. यामुळे एकच खळबळ माजली होती. गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरात बसने अचानक पेट घेतला होता. आग लागल्याने बस जळून खाक झाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र आगीमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बेस्ट बसने गोकुळधाम परिसरात अचानक पेट घेतला. आग लागली तेव्हा बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमध्ये असणारे ड्रायव्हर आणि कंडक्टरने वेळीच बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best bus caught fire in goregaon