मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून राज्यातील विविध भागांतून एसटी बसेस तसेच खासगी बससेमधून कार्यकर्ते आणले जात आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाकडे १० कोटी रुपये रोख भरले असून एवढी मोठी रक्कम कोठून आली, हे पैसे त्यांना कुणी दिले, एवढय़ा मोठय़ा रकमेचा रोख व्यवहार करता येतो का यांसह इतर संपूर्ण खर्चाची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) व प्राप्तिकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दसरा मेळाव्यासाठी एसटी बसेस आरक्षित करताना शिंदे गटाने १० कोटी रुपये रोख दिल्याचे समजते आहे, ही रक्कम शिवसेना पक्षाच्या खात्यातून दिली आहे का, नसेल तर ही रक्कम कुठून आणली, १० कोटींचा रोख व्यवहार कसा केला, शिंदे यांच्या पक्षाची अजून अधिकृत नोंदणीही झालेली नाही, मग हा पैसा कोणत्या खात्यातून आला, हा आर्थिक गैरव्यवहार नाही का, असे प्रश्न अतुल लोंढे यांनी उपस्थित केले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress chief spokesperson atul londhe demand ed investigation of shinde camp zws
First published on: 05-10-2022 at 04:45 IST