मुंबई : मृत अथवा समभागांवर अनेक वर्ष दावा न केलेल्या समभागधारकांची माहिती मिळवून बनावट कागदपत्रांद्वारे त्यांची सुमारे पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात सोमवारी गुन्हा दाखल केला. सुमारे पाच शेअरधारकांबाबत असा प्रकार घडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका प्रसिद्ध दलाली पेढीच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. तक्रारदार कुणाल कोठारी एका दलाली पेढीत उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. तक्रारीनुसार, मृत अथवा अनेक वर्ष समभागांवर दावा न केलेल्या मृत समभागधारकांची माहिती आरोपींनी मिळविली. या माहितीच्या आधारे अशा समभागधारकांच्या नावाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड बनवले. त्याद्वारे आरोपीने बँक खाते उघडून याच बँक खात्याच्या आधारे तक्रारदार दलाली पेढीमध्ये डिमॅट खाते उघडले. त्यानंतर आरोपीने सुमारे पाच व्यक्तींच्या नावावरील कोट्यावधी रुपयांचे समभाग तक्रारदार दलाली पेढीतील डिमॅट खात्यात वळते केले. त्यानंतर या समभागांची विक्री करून जमा झालेली रक्कम बनावट कागदपत्रांद्वारे उघडलेल्या बँक खात्यांमध्ये वळती करण्यात आली.

हेही वाचा – मध्य रेल्वेच्या आरपीएफने ६६ प्रवाशांचे वाचवले प्राण

हेही वाचा – मुंबई : बनावट डॉक्टरांकडून एक कोटी रुपयांची फसवणूक, चौकशीत ९ तक्रारदारांची माहिती उघड

२०१९ पासून आतापर्यंत सुमारे पाच ग्राहकांची अशा प्रकारे एकूण सहा कोटी ८८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदार दलाली पेढीला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ५० लाख रुपयांचे व्यवहार थांबवले. आरोपीने दूरध्वनी करून संबंधित समभाग विक्री करण्यास सांगितल्याचे नोंदणीतून स्पष्ट झाले आहे. फसवणूक करण्यात आलेल्या ग्राहकांच्या नावाने दादर, वडाळा व गोरेगाव येथील विविध बँकांच्या शाखेत खाती उघडण्यात आली आहेत. तसेच तपासणीत आधारकार्डवरील छायाचित्र डीमॅट खाते उघडताना वापरण्यात आले आहे. तक्रारीनंतर मुंबईतील कस्तुरबा मार्ग पोलिसांनी फौजदारी विश्वासघात व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दिल्ली आर्थिक गुन्हे शाखाही तपास करीत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of crores through forged documents a case has been registered on the complaint of dalali pedhi mumbai print news ssb