मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावरील एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सत्र न्यायालयात खटला प्रलंबित असतानाही अभिनेता सलमान खान याने स्वत:च्या संकेतस्थळावर खटल्याची माहिती प्रसिद्ध केली होती. त्यानंतर सलमानविरुद्ध महानगरदंडाधिकाऱ्यांकडे अवमानाची कारवाई करण्याची तक्रार करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या कारवाईला स्थगिती देत सलमानला दिलासा दिला.  हेमंत पाटील यांनी वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांकडे सलमानविरुद्ध खासगी तक्रार करीत त्याच्यावर अवमानप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. खटल्याबाबत चुकीची वृत्त प्रसिद्ध केली जाऊ नये या हेतुनेच  हे संकेतस्थळ सुरू करून खटल्याच्या सुनावणीबाबतच्या घडामोडी त्यावर जाहीर केल्याचा दावा सलमानने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai high court gives relief to salman in hit and run case