मुंबई : कायम वाहनांच्या वर्दळीने गजबजलेले मुंबईतील काही रस्ते रविवारी मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी फुलले होते. पोलीस आयुक्त संजय पांडे हे मरिन ड्राइव्ह येथे सायकल चालवून या उपक्रमात सहभागी झाले. मुंबईकरांना तणावमुक्त वातावरणात जगता यावे याकरिता मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ‘संडे स्ट्रीट’ ही संकल्पना मांडली होती. त्यानुसार मुंबईतील विविध रस्त्यांवर रविवारी सकाळच्या वेळेत मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई शहरातील लोकांना तणावमुक्त वातावरणात वावरता यावे तसेच त्यांना रस्त्यावर येऊन मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकिलग, तसेच सांस्कृतिक खेळ यांसारखे कार्यक्रम करता यावेत याकरिता पोलीस आयुक्तांनी ही संकल्पना आखली होती. रस्त्यावर पादचाऱ्यांचा पहिला हक्क असला तरी वाहनांच्या वर्दळीमुळे पादचारी नेहमी जीव मुठीत घेऊन रस्त्यावर चालतात. मात्र रविवारी त्याचा शुभारंभ झाला. आता प्रत्येक रविवारी पहाटे ६ ते १० ही वेळ अशा कार्यक्रमांसाठी राखून ठेवला जाणार आहे. त्याकरिता ठरावीक रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. या वेळेत काही रस्त्यांवरील एकेरी वाहतूक किंवा काही रस्त्यांवर पूर्ण वाहतूक बंद ठेवून ते लोकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.  मरिन ड्राइव्ह येथे पोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तेथे सायकिलग, कराटे, मार्शल आर्ट्सबाबत कार्यक्रम पार पडले. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी स्वत: नागरिकांसोबत सायकिलग केली.

या रस्त्यांची निवड या उपक्रमाकरिता मरिन ड्राइव्ह, वांद्रे, गोरेगाव, मलुंड, विक्रोळी, येथील रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. मरिन ड्राइव्ह येथे मुरली देवरा चौकापासून एनसीपीएपर्यंतचा १.७ किमी.चा रस्ता, वांद्रे येथील कार्टर रोडवर ओटर्स क्लब ते सीसीडी दरम्यानचा २ किमी रस्ता, गोरेगाव येथील माइंड स्पेसमागील रस्त्यावरील ५०० मीटर लांबीचा भाग, लोखंडवाला मार्ग येथील समर्थ नगर म्हाडा टॉवर ते जॉगर्स पार्कचा ६०० मीटर लांब रस्ता, मुलंडमधील तानसा जलवाहिनीलगत मुलंड गोरेगाव िलक रोड, तानसा जलवाहिनी ते विणा नगरचा अडीच किलोमीटरचा रस्ता, विक्रोळी येथे पूर्व द्रुतगती मार्गाजवळ विक्रोळी पुलाजवळ सव्‍‌र्हिस रोडचा अडीच किलोमीटरचा भाग या रस्त्यांचा त्यात समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbaikar participates in sunday street initiative zws