मुंबई : ‘रुणवाल फाउंडेशन’ आणि ‘महावीर एज्युके शन अ‍ॅण्ड रिसर्च ट्रस्ट’ यांनी संयुक्तरीत्या उभारलेल्या ‘रुणवाल स्टे’चे उद्घाटन शनिवारी नेस्को करोना केंद्राच्या अधिष्ठाता नीलम आंद्रेद यांच्या उपस्थितीत पार पडले. करोना संसर्गाच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही इमारत पालिके कडे हस्तांतरित करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस, डॉक्टर, इत्यादी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी करोना संसर्गाचा धोका पत्करून दूरचा प्रवास करत कर्तव्यावर पोहोचत आहेत. यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही करोनाचा धोका आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सुरक्षित निवास देण्याच्या उद्देशाने ही इमारत उभारण्यात आली आहे. जोगेश्वारी येथे असलेल्या या ३ मजली वसतिगृहात ५४ व्यक्ती सामावून घेण्याची क्षमता आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना येथे राहण्यासाठी भाडे आकारले जाणार नाही. करोनाच्या काळात इतरत्र तात्पुरते वास्तव्यास असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पोहोचताना प्रवासात करोना संसर्ग होण्याचा धोका आहे. शिवाय काही वेळा या कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू पुरेशा उपलब्ध होत नाहीत. त्यांच्यासाठी नव्याने उभारलेल्या वसतिगृहात मात्र त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Runwal stay saurabh runwal bmc working essential services during corona period akp