अमरावतीत राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या शिबिरातून परतत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या ट्रॅक्‍टरला अपघात झाला असून ट्रॉली उलटल्‍याने २२ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने दर्यापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा थरार मोबाईल कॅमेरात चित्रित झाला आहे.
दर्यापूर येथील जे. डी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर आटोपून विद्यार्थी ट्रॅक्टरने परतत होते. अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली आहे. सध्या पोलीस रुग्णालयात दाखल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- सावधान! क्रिप्टोकरन्सीतून वेतनाचे आमिष; संगणक अभियंता विवाहितेस लाखोंनी गंडवले

दर्यापूर तालुक्‍यातील जैनपूर येथे राष्ट्रीय सेवा शिबीर सुरू होते. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या शिबिराचा आज शेवटचा दिवस होता. शिबीर संपल्यानंतर सर्व विद्यार्थी कॉलेजच्यावतीने भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्टरमधून दर्यापूरकडे निघाले होते. जैनपूर नजीक वळणावर ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॉली उलटली. या अपघातात सुमारे २२ विद्यार्थी हे गंभीर जखमी झालेले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले. मात्र काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आता तातडीने अमरावती येथे हलविण्यात आले आहे. रुग्‍णालयात विद्यार्थ्यांच्‍या नातेवाईकांनी गर्दी केली. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 students injured after tractor trolley overturned in amravati mma 73 dpj