scorecardresearch

यवतमाळमध्ये क्रूझर व दुचाकीच्या अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी

दिग्रस-आर्णी वळणमार्गावर चारचाकी वाहन क्रूझर व दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

Yavatmal Accident

यवतमाळ : दिग्रस-आर्णी वळणमार्गावर चारचाकी वाहन क्रूझर व दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. याकूब खान हारून खान (३५, रा. मोतीनगर दिग्रस) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (२५ मे) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

ढाणकी बिटरगाव येथून लग्नाचे वऱ्हाडी घेऊन दिग्रसकडे येत असणारी क्रूझरची (क्र.एम एच २९ बी सी ६६५४) व दिग्रस मोतीनगरकडे जाणाऱ्या दुचाकीची (क्र.एम एच २९ यू ७६२७) समोरासमोर जबर धडक झाली. अपघातात दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाले. उपस्थित नागरिकांनी जखमींना आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या ठिकाणी याकूब खान हारून खान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सलीम खान बाबा खान (३४, रा. मोतीनगर दिग्रस) याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातातील क्रुझर वाहन पोलीस ठाण्यात नेऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accident on digras arni road in yavatmal one dead one injured pbs