अकोला : सोयाबीन पिकावर ‘पिवळा मोझक’ रोगाचे आक्रमण होताना आढळले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत घट येण्याचा धोका संभवतो. रोगावर नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम विदर्भात खरीप हंगामाता सोयाबीनचा पेरा सर्वाधिक क्षेत्रावर आहे. सध्या परिस्थितीत सोयाबीन हे पीक फुलरा अवस्थेत आले आहे. त्यामध्ये बहुतांश ठिकाणी पिकावर ‘पिवळा मोझक’ रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. हा रोग ‘मुंगबीन येलो’ मोजक विषाणू व ‘मुंगबीन येलो मोझ्याक इंडिया’ विषाणू या प्रजातीमुळे होतो. या विषाणूची वाहक पांढरी माशी आहे. उबदार तापमान, वाहक पांढऱ्या माशीची अधिक संख्या, दाट पेरणी, नत्राची अधिक मात्रा तसेच शेतातील तणे आदींमुळे रोग वाढण्यास मदत होते. या राेगाचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. या रोगाचे संक्रमण पीक फुलरा होण्याअगोदर झाले असल्यास ९० टक्के उत्पादनात घट जाणवू शकते. एकंदर पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होते; परंतु ७५ दिवसांनंतर संक्रमण झाल्यास फारसे नुकसान संभवत नाही, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

हेही वाचा – नागपूर : पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली

रोगट झाडाच्या पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. तसेच शेंगाचा आकार लहान राहून यामध्ये दाणेसुद्धा कमी राहतात. हिरवे पिवळे पाने असलेले झाड दुरून ओळखता येतात. पानांमधील हरितद्रव्य नाहीसे झाल्याने अन्न निर्मितीमध्ये बाधा निर्माण होऊन उत्पादनात घट येते. यावर व्यवस्थापन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

‘पिवळा मोझक’चा प्रादुर्भाव कमी असेल तर शेतात तीन-चार झाडे दिसत असेल तर, सतत निरक्षण करणे जरुरी आहे व प्रादुर्भावग्रस्त झाडे काढून टाकून गाढणे गरजेचे आहे. पिवळे चिकट सापळे हेक्टरी १६० या प्रमाणे लावावेत. उन्हाळी सोयाबीन पिक घेऊ नये. रस शोषक किडींच्या व्यापस्थानासाठी अंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. पेरणीनंतर २०-३५ दिवसांनी निंबोळी अर्काची पाच टक्के फवारणी करावी, अशा उपाययोजना सहाय्यक वनस्पती रोग शास्त्रज्ञ प्रा. राजीव घावडे व प्रा. प्रकाश घाटोळ यांनी सूचवल्या आहेत.

हेही वाचा – धावत्या रेल्वेगाडीतील पाणी संपल्याचे आता लगेच कळणार, मध्य रेल्वेतील अभियंत्याचे संशोधन

वाढते तापमान रोगासाठी पोषक

सध्या वातावरणातील तापमान वाढत आहे. पावसाचा खंड पडला. त्यामुळे रोगाचा वाहक पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून तो सातत्याने वाढत आहे. त्यामुळे ‘पिवळा मोझक’ विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव अधिक व्यापक प्रमाणात वाढण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack of yellow mozak disease on soybean risk of yield reduction up to 90 percent ppd 88 ssb