चंद्रपूर : क्रिकेट खेळताना मैदानात दोन गटात वाद झाल्याने एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर बॅटने वार केला. या हल्ल्यात फैजन अखिल शेख (१२) हा मुलगा जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता ५ जून रोजी मृत्यू झाला. बुधवारी अल्पवयीन मृत मुलाचा दफनविधी केलेला मृतदेह बुधवारी शवविच्छेदनासाठी काढण्यात आला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुला विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाळाना उन्हाळी सुट्ट्या आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी म्हणून मुले बगड खिडकी परिसरात मैदानावर रोज सकाळ संध्याकाळ क्रिकेट खेळत असतात. ३ जून रोजी क्रिकेट खेळताना दोन गटात हाणामारी झाली. यावेळी एका अल्पवयीन मुलाने फैजन अखिल शेख या मुलाचे डोक्यावर बॅट मारली. यात शेख जखमी झाला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. ५ जून रोजी त्या जखमी मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या आईने याबाबतची तक्रार केली. त्यानंतर बुधवारी या मुलाचा दफन विधी केलेला मृतदेह बाहेर काढण्यात आलं. शहर पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fighting while playing cricket death of a minor child rsj 74 ysh