नागपूर: नागपूरच्या हजारीपहाड मुख्य रस्त्यालगत केबल टाकताना कंत्राटदारांने काळजी न घेतल्याने पाणी पुरवठा करणारी १५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे या वाहिनीवरून पाणी पुरवठा होणा-या दहाहून अधिक वस्त्यांचा पाणी पुरवठा खंडित होणार आहे. गळती बंद होईपर्यंत हजारी पहाड परिसरातील आशाबाळ वाडी, खातीपुरा, वायूसेना, कृष्णा नगर, गवळीपुरा आदी झोपडपट्टयांसह गायत्री नगर वसाहत परिसर, चिंतामनगर, भिवसेन खोरी, भूमी अभिलेख, मनरुष नगर, नागरवस्ती आदी भागातील वस्त्यांना पाणी पुरवठा होणार नाही, असे ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सने ( ओसीडब्लू)  कळवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leakage water pipe while laying cable affected these settlements cwb 76 ysh