नागपूर : संबंध तुटल्यानंतर पूर्वीच्या प्रियकराने अश्लील छायाचित्र समाज माध्यमांवर टाकून एका तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज जयसिंग रा. गिट्टीखदान असे आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित २६ वर्षीय तरुणीसोबत आरोपीचे प्रेमसंबंध होते. तिच्या व्यतिरिक्त तो इतर मुलींनाही फिरवत होता. याची माहिती पीडितेला मिळाली. त्यामुळे तिने त्याला रागावले व दुसऱ्या मुलींसोबत असलेले प्रेमसंबंध तोडून आपल्याशी एकनिष्ठ राहण्याची विनंती केली. पण, त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले व इतर मुलींशी संबंध कायम ठेवण्यासाठी हिच्याशी संबंध तोडले. त्यानंतर इन्स्टाग्राम या समाज माध्यमांवर एक तरुणीच्या नावाने बनावट खाते उघडून त्या ठिकाणी पीडितेचे व स्वत:चे अश्लील छायाचित्र टाकून बदनामी केली. हा प्रकार लक्षात येताच पीडितेने पोलीस ठाण्यात संपर्क करून तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंग व माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

दुसरी विनयभंगाची घटना अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली असून हेमंत नंदन ठाकूर (२०) रा. रामनगर याने १८ वर्षीय पीडितेला भेटण्यासाठी एका ठिकाणी बोलवले. ती भेटायला गेली असता आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे करून विनयभंग केला.

विनयभंगाची तिसरी घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत घडली. २५ वर्षीय या गुरुवारी रात्री घरी झोपली असता वस्तीत राहणारा एक तरुण तिच्या घरात घुसला व तिच्या अंथरुणावर येऊन अश्लील चाळे करू लागला. तिला जाग आली असता ती ओरडली. त्यानंतर आरोपी पळून गेला. पोलिसांनी गौरव नावाच्या तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man viral girlfriend nude photos on social media zws