बुलढाणा : समाजमाध्यमावर कार्यकर्ते वा नागरिकांनी आक्षेपार्ह मजकूर टाकण्याच्या घटना आपण वाचतो. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याने असा मजकूर टाकल्याचे निदर्शनास आले असून त्याला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – वर्धा : ताटवाट्या वाटप, झुंबड उडाल्याने अपघाताची शक्यता

हेही वाचा – उपराजधानीत गन कल्चर फोफावतंय… बंदुकबाजांची दहशत वाढली; चार वर्षांत ९४ गुन्ह्यात १०६ पिस्तूल जप्त

गजानन खेर्डे असे या बहाद्धराचे नाव असून तो खामगाव येथील पोलीस नियंत्रण कक्षात सहायक फौजदार या पदावर कार्यरत आहे. त्याने सामाजिक माध्यमावर दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकला. ही बाब निदर्शनास आल्यावर याची गंभीर दखल पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी घेतली. पडताळणी नंतर खेर्डे याला आज निलंबित करण्यात आले. याचे आदेश सोमवारी संध्याकाळी काढण्यात आले. तसेच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या नियमित गुन्हे आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे निर्देश करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Posting objectionable content on social media police arrested scm 61 ssb