अकोला : मृद व जलसंधारण विभागाकडून जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार जलयुक्त शिवार समितीद्वारे निकषानुसार पात्र गावांची निवड करण्यात आली आहे. निवड केलेल्या १३१ गावांना आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली. निवड झालेल्या गावांचा अंतिम आराखडा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित विभागांना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अमरावती : जिल्हा परिषदेचे शिक्षक पाच महिन्यांपासून पुरस्काराच्या प्रतीक्षेत

जलयुक्त शिवार अभियान अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरिभाऊ गिते, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाचे वरिष्ठ भुवैक्षणिक एन.बी.इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मुरली इंगळे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांवर खासदार अरविंद सावंत यांची टीका; म्हणाले, “ते तर…”

गाव आराखडा शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणेच तयार करावा. मृद व जलसंधारणाच्या कामात खासगी, अशासकीय संस्था तसेच लोकसहभाग घ्यावा. तसेच जलयुक्त शिवार अभियानातर्गंत निवड झालेल्या गावांचे सुक्ष्म नियोजन करून अंतिम आराखडा तयार करावा, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या योजनेसाठी बार्शिटाकळी तालुक्यातील १९, अकोला तालुक्यातील १७, मूर्तिजापूर २७, अकोट २३, तेल्हारा २४, बाळापूर आठ व पातूर तालुक्यातील १३ गावांचा समावेश आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second phase of jalyukt shivar will be implemented in 131 villages ppd 88 zws