नंदुरबार – तालुक्यातील रनाळा येथे नाल्याच्या पाण्यात उतरलेल्या म्हशी बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावांचा बुडून मृत्यू झाला. पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रनाळा येथील अल्पभूधारक शेतकरी दगा धात्रक यांची दोघे मुले म्हशी चारुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावत होते. दोघे जण नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी गेले होते. धात्रक यांच्या रनाळे शिवारातील शेतालगत सटवाईबारीपाडा बंधारा आहे. त्यालगतच्या नाल्यात त्यांच्या म्हशी चरत असताना पाण्यात गेल्या. बराच वेळ उलटूनदेखील काही केल्या म्हशी बाहेर येईना. यामुळे विकी (२२) हा म्हशींना बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागल्याचे त्याचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर (२५) याच्या लक्षात आल्याने तो भावाला वाचविण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, दोघे जण पाण्यात बुडाले.

हेही वाचा – नाशिक : पार नदीच्या पुरात वाहून युवकाचा मृत्यू

सदरची बाब काठावर बसलेल्या तिघा लहान मुलींच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड करुन परिसरातील नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच लगतच्या शेतातील शेतकरी व मजूर मदतीसाठी धावले. परंतु, तोपर्यंत दोघे जण पाण्यात बुडाले होते. परिसरातील काहींनी पाण्यात उड्या घेत त्यांचा शोध घेतला. तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा – नाशिक : अवैध फेरीवाले, रिक्षांवर कारवाई न झाल्यास बंद , व्यापारी संघटनांच्या बैठकीत निर्णय

ज्ञानेश्वरचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला असल्याचे समजते. दरम्यान, दोघांचे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.