नवी मुंबई: मागील शनिवारपासून पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे नाकावाटे दिली जाणारी इन्कोव्हॅक लस देण्यास अडचणी येत होत्या. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करोना  लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीचा समवेश करण्यात आला असून आज या लसीकरणाचा श्रीगणेशा झाला असून  शहरातील फक्त ७ जणांनी नाकावाटे दिली जाणारी मात्रा घेतली आहे .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई  महापालिकेने  २२ एप्रिलपासूनच देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु कोविन पोर्टलवर लस समावेश करण्याच्या कामात तांत्रिक अडचणी आल्यामुळे लसीकरण सुरु झालेले नव्हते.  परंतु आज पालिकेच्या वाशी ,नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयात लसीकरण देण्यात आले.यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्या सूचनेनुसार लसीकरण थांबविण्यात आले होते. आता पोर्टलवर  इन्कोव्हॅक लसीचा समावेश झालेला असल्याने सुरु झाले आहे. नाकावाटे दिली जाणारी ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस आहे. आज नेरूळ येथील पालिकेच्या रुग्णालयात नारायण बंगेरा व गिरिजा बंगेरा  यांनी लस घेतल्याची माहिती लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण  यांनी लोकसत्ताला  दिली असून  लसपात्र नागरिकांनी लसवंत होण्याचे आवाहन केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incovac vaccination given citizens above 60 years of age started from today ysh