माजी विरोधीपक्ष नेते मनोज हळदणकर यांच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी लावलेले बेकायदा फलक काढताना त्यांनी मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.  संदिप भिमराव जाधव, हे यातील फिर्यादी असून ऐरोली विभाग कार्यालयात अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत. २३ तारखेला त्यांना वरिष्ठ  लिपीक विष्णु शिंगवे यांचेसोबत ऐरोली परिसरातील विनापरवाना अनाधिकृत लावलेले बॅनर काढण्याचे आदेश मिळाले. त्यानुसार ते अतिक्रमण पथकांसह  ऐरोली परिसरात रवाना झाले. दुपारी एकच्या सुमारास ऐरोली विभाग कार्यालय शेजारी  फोनिक्स शाळेच्या शेजारी, रिक्षास्टैंड जवळ माजी नगरसेवक मनोज हळदनकर यांनी गुढीपाडवा शुभेच्छा. सदर्भात विनापरवाना अनाधिकृत बॅनर लावलेले दिसुन आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवी मुंबई: महापालिका रुग्णालयात आर्थिक व्यवहारातून झालेल्या कर्मचारी भरतीच्या चौकशीची मागणी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police file case against former nmmc opposition leader for abusing and threats municipal employees zws
First published on: 28-03-2023 at 23:25 IST