मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध मालधक्क्यावरील माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी विश्रांतिगृह, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, प्लॅटफॉर्म व रस्तेदुरुस्ती, दिवाबत्तीची सोय आदी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विविध रेल्वे यार्डात पिण्याचे पाणी, विश्रांतिगृह, शौचालय, प्लॅटफॉर्म व रस्तेदुरुस्ती आदी सुविधांचा अभाव असून, त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने रेल्वे प्रशासन व कामगारमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती. त्या संदर्भात दि.२० एप्रिल रोजी राज्याचे कामगार शमंत्री सुरेश खाडे यांनी मंत्रालयात संयुक्त बैठक आयोजित केली होती. त्या वेळी या सूचना केल्या.

हेही वाचा >>>उरण शहरात बेशिस्तीची कोंडी, भर उन्हात वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास!

विविध रेल्वे यार्डांत माथाडी कामगार व अन्य घटकांना आवश्यकत्या सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर रेल्वे यार्डांत आवश्यक सुविधा उपलब्ध होण्याकरिता रेल्वे प्रशासन व संबंधितांनी तातडीने कार्यवाही करावी, जेणेकरून माथाडी कामगार व अन्य घटकांचे सुरू असलेले हाल संपुष्टात येतील, अशा सूचना केल्या. त्याचबरोबर रेल्वे यार्डांतील क्लीअरिंग एजंटकडून माथाडी कामगारांच्या कामाची लेव्हीसह मजुरी बोर्डात भरणा होण्याबद्दल आणि लेव्हीसह मजुरी वसूल करण्याबद्दल माथाडी बोर्डातर्फे कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून विविध रेल्वे यार्डांतील माथाडी कामगार व अन्य घटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्याकरिता महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने रेल्वे प्रशासन मंत्र्यांकडे मागणी केली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various problems of mathadi workers in railway yards will be met navi mumbai amy