उरण ते मोरा जलसेवा पुन्हा बंद

उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का या दोन बंदरांच्या दरम्यान जलसेवा दिली जात असून पावसाळ्यातही ही सेवा सुरू असते.

उरण ते मोरा जलसेवा पुन्हा बंद
(संग्रहित छायाचित्र)

उरण : वादळीवाऱ्यामुळे समुद्रात धोक्याचा इशारा देण्यात आल्याने मागील आठवडाभर मुंबई ते उरणदरम्यानची जलसेवा बंद होती. ती सुरू होत नाही तोच मंगळवारी पुन्हा एकदा वातावरणातील बदलामुळे बंद करण्यात आली आहे.

उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का या दोन बंदरांच्या दरम्यान जलसेवा दिली जात असून पावसाळ्यातही ही सेवा सुरू असते. परंतु मागील आठवड्यात हवामान विभागाने वर्तविलेल्या अनुमानानुसार वादळी वारे वाहणार असल्याने समुद्रात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता. त्यामुळे ही जलसेवा बंद करण्यात आली होती. ती शनिवारी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. मात्र मंगळवारी हवामानात बदल झाल्याने ही सेवा पुन्हा एकदा बंद करण्यात आली असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water transport from uran to mora closed again due to climate change zws

Next Story
डोक्यात वार करून व्यापाऱ्याचा खून ; कृषी उत्पन्नच्या भाजी बाजारातील घटना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी