-
९० च्या दशकातील अनेक अभिनेते आजही तितकेच प्रसिद्द आणि हिट आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे अजय देवगण. अजय देवगण आज आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपटांमधून अनेकदा गंभीर भूमिकांमध्ये दिसणारा अजय देवगण खऱ्या आयुष्यातही कुटुंबाच्या बाबतीत तितकाच गंभीर आहे. बॉलिवूडमध्ये फॅमिली मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अजय देवगणचं नाव घेतलं जातं. (All Photos: Instagram)
-
अजय देवगण सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे फोटो अनेकदा शेअर करत असतो.
-
२ एप्रिल १९६९ रोजी एका पंजाबी कुटुंबात अजय देवगणचा जन्म झाला. अजय देवगण मूळचा अमृतसरचा आहे. नंतर अजय देवगणचं कुटुंब दिल्लीला शिफ्ट झालं.
-
अजय देवगणचे वडील विरु देवगण स्टंट आणि ऍक्शन डायरेक्टर होते. तर आई विना देवगण निर्मात्या आहेत. अजय देवगणने फुल और काँटे चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. विरु देवगण यांचा मुलगा असल्याने त्याच्या नावाची चांगलीच चर्चा होती.
-
अजय देवगणने १९८५ मध्ये प्यारी बेहना चित्रपटात बालकलाकाराची भूमिका निभावली होती. त्या चित्रपटात अजय देवगणने मिथून चक्रवर्ती यांच्या बालपणातील भूमिका निभावली होती. त्यावेळी त्याला मास्टर छोटू असं नाव ठेवण्यात आलं होतं.
-
पहिल्याच चित्रपटातून अजय देवगणच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली होती. यानंतर सुहाग, विजयपथ, दिलवाले अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये अजय देवगणने काम केलं.
-
अजय देवगण आणि काजोलची पहिली भेट १९९५ मध्ये गुंडाराज चित्रपटाच्या सेटवर झाली. तेव्हापासून सुरु झालेलं त्यांचं नात आजही घट्ट आहे.
-
काजोल आणि अजय देवगण यांचं लग्न होण्याआधी दोघांनीही इश्क, प्यार तो होना ही था, दिल क्या करे चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.
-
२४ फेब्रुबारी १९९९ मध्ये अजय देवगण आणि काजोलने लग्नगाठ बांधली. अत्यंत साध्या पद्धतीने दोघांनी लग्न केलं. कुटुंबातील काही सदस्यच या लग्नाला उपस्थित होते.
-
२००३ मध्ये काजोलने न्यासाला जन्म दिला आणि २०१० मध्ये युगचा जन्म झाला.
-
सुरुवातील अजय देवगण आणि काजोल हे न्यासा आणि युग दोघांनाही मीडियापासून दूर ठेवत होते. पण आता ते अनेकदा त्यांच्यासोबत पार्टी तसंच इतर कार्यक्रमांमध्ये दिसतात.
-
इतर सेलिब्रेटींच्या मुलांप्रमाणे युग आणि न्यासा मीडियामध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत.
-
अजय देवगणने एका मुलाखतीत बोलताना मुलगी न्यासाबद्दल बोलताना सांगितलं होतं की, “मला तिच्या फॅन फॉलोइंगबद्दल जास्त माहिती नाही. फॅशनचं माहिती नाही पण ती व्यवस्थित कपडे घालते. आजकालच्या मुलांना ते आवडतं. तिचा फॅशन सेन्स चांगला आहे. आम्ही कोणीही तिच्या कपड्यांच्या बाबतीत दखल देत नाही”.
-
युग अनेकदा अजय देवगणसोबत मस्ती करताना आढळतो.
-
काजोलने एका मुलाखतीत बोलताना युगसाठीच आपण करिअरला ब्रेक दिला होता असं सांगितलं होतं.
-
अजय देवगणला मुलगी न्यासा चित्रपटसृष्टीत येणार का असं विचारलं असता त्याने सांगितलं होतं की, “मी तिला थांबवू शकत नाही. पण सध्या तिला अभिनेत्री होण्याची कोणतीही आवड नाही. पण उद्या काय होईल सांगू खकत नाही. ती सध्या तिच्या शिक्षणात व्यस्त आहे”.
-
-
न्यासाने करिअरबद्दल विचार करणं सध्या खूप घाईचं होईल. आम्ही तिला शिक्षणासाठी सिंगापूरमधील सर्वोत्तम शाळेत पाठवलं आहे. तिथे राहणं तिच्यासाठी चांगलं आहे. तिथे तिला सतत मीडियाचा त्रास होणार नाही. इथे मीडिया सारखा त्यांचा पाठलाग करत असतो असं अजय देवगण म्हणतो.
-
मुलांना मीडियाकडून मिळणाऱ्या प्रसिद्धीवर अजय देवगण सांगतो की, “मी जेव्हा न्यासाला एखाद्या ठिकाणी मीडियामुळे जाऊ नको असं सांगतो तेव्हा ती माझे सगळे मित्र तिथे चालले आहेत. मग मी तिथे नको जाऊ का?”. आम्ही अभिनेता होण्याचा निर्णय घेतला आणि मीडियाचं लक्ष वेधून घेत आहोत. पण आमच्या मुलांनी ती मागितलेली नाही असंही तो सांगतो.
-
पण जेव्हा कधी सोशल मीडियावर न्यासा आणि युगला ट्रोल केलं जातं तेव्हा आपल्याला फार वाईट वाटतं असं अजय देवगण सांगतो. मुलांना टार्गेट करणं योग्य नाही असं अजय देवगणचं म्हणणं आहे.
-
तुम्हाला मत मांडायचं आहे तर माझ्याबद्दल मांडा, मुलांबद्दल नाही. मी आणि काजोल अभिनेते आहोत, आम्हाला जज करा. आमच्यामुळेच आमची मुलं दरवेळी स्पॉटलाइटमध्ये असतात. एखाद्याबद्दल मत बनवणं चांगली गोष्ट नाही. मी जर असं केलं तर समोरच्या व्यक्तीला दुख होईल. तसंच माझ्या मुलाचं आहे असं अजय देवगण सांगतो.
-
मुलगी न्यासाने परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजय देवगणला फार वाईट वाटलं होतं असं काजोलने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
-
-
अजय देवगणसाठी त्यांचं कुटुंबच सर्व काही असून तो नेहमी याबद्दल बोलताना दिसतो.
कुटुंबच सर्व काही असणाऱ्या अजय देवगणचे हे फोटो पाहिलेत का
अजय देवगण आज आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
Web Title: Bollywood actor ajay devgan photos with family sgy