-
दमदार अभिनयकौशल्यासोबतच दमदार लूकसाठीही काही कलाकार ओळखले जातात. मराठी कलाविश्वातील 'मोस्ट डिझायरेबल मॅन २०२०'ची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीतील टॉप १५ कलाकारांची नावं जाणून घेऊयात… (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
अभिनेता अजिंक्य राऊतने 'मोस्ट डिझायरेबल मॅन २०२०' होण्याचा बहुमानही पटकावला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विठूमाऊली’ या मालिकेतून अजिंक्य घराघरात पोहोचलेला.
-
'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत बबड्या अर्थात सोहमची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष पत्की या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
-
'दख्खनचा राजा ज्योतिबा' या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विशाल निकम या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशाल स्वत: जिम ट्रेनर असून नुकताच अभिनयाकडे वळला आहे.
-
मराठी चित्रपटसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकर चौथ्या स्थानावर आहे.
-
‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या मालिकेत ओमकारची भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
-
'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता राज हंचनाळे सहाव्या क्रमांकावर आहे.
-
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या निमित्ताने घरघरात पोहोचलेला अभिनेता आशुतोष गोखले या यादीत सातव्या स्थानावर आहे.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.
-
अभिनेता आशय कुलकर्णी नवव्या क्रमांकावर आहे.
-
तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता सुयश टिळक दहाव्या क्रमांकावर आहे.
-
अभिनेता यशोमान आपटे या यादीत अकराव्या स्थानावर आहे. कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याची तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे.
-
अभिनेता आरोह वेलणकर बाराव्या स्थानी आहे.
-
'दुर्वा'नंतर स्टार प्रवाहच्या 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता हर्षद अटकरी तेराव्या स्थानावर आहे.
-
‘माझा होशील ना’ या मालिकेतील आदित्य म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णी चौदाव्या स्थानावर आहे.
-
अभिनेता साईंकित कामत या यादीत पंधराव्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्राचे मोस्ट डिझायरेबल मेन २०२०; पहा संपूर्ण यादी
Web Title: Maharashtra most desirable men on tv 2020 marathi actor list style fashion look sdn