-
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असले तरी देशाच्या अनेक भागांत पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे सध्या डासांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
डासांच्या चावण्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर अनेक गंभीर आजारांसह अनेक आजार होतात. खेड्यांपासून मोठमोठ्या शहरांपर्यंत प्रत्येक ठिकाणी डासांची दहशत पाहायला मिळते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता) -
अनेक उपाय करूनही डासांची ही पैदास कमी होत नाही, त्यामुळेच आज आम्ही डासांना दूर पळवून लावण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
निलगिरी तेलाचा स्प्रे बनवण्यासाठी १० मिली निलगिरी तेलाला ९० मिली नारळाच्या तेलात मिसळा आणि याचा वापर करा. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
डासांना दूर ठेवण्यासाठी कडुलिंबाचा धूर खूप प्रभावी आहे. यासाठी तुम्ही सुक्या कडुलिंबाची पाने जाळून त्याचा धूर घरात पसरवू शकता. तुम्ही कडुलिंबाच्या तेलाचा दिवादेखील लावू शकता, यामुळे खोलीतील वातावरणही सुधारते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रथम लसूण पाण्यात उकळा. आता तुम्ही हे पाणी तुमच्या खोलीत व्यवस्थित फवारा (फोटो सौजन्य: लोकसत्ता) -
लवंगाच्या तेलाचा स्प्रे बनवण्यासाठी १० थेंब लवंगाच्या तेलामध्ये ६० मिली पाणी मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
डास पळवून लावून स्वतःसह घरातल्यांचे संरक्षण करण्यासाठी लव्हेंडर, कडुलिंब, सिट्रोनेला, निलगिरी व पुदीना यांपैकी एखादे तेल वापरा. एका स्प्रे बाटलीत त्यातील एका तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळा आणि ते तुमच्या घरात शिंपडा. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
तसेच तुमच्या संरक्षणासाठी कडुलिंबाचे तेल, खोबरेल तेल व लव्हेंडर तेलाचे काही थेंब एकत्र करून, अशा संमिश्रित तेलयुक्त पाण्याचा स्प्रे तयार करून त्याची सर्वत्र फवारणी करा. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
डेंग्यूच्या मच्छरांपासून वाचण्यासाठी ‘हा’ सोप्पा उपाय ठरेल फायदेशीर
How to avoid mosquito: अनेक उपाय करूनही डासांची ही पैदास कमी होत नाही, त्यामुळेच आज आम्ही डासांना दूर पळवून लावण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Web Title: This simple remedy will be beneficial to protect yourself from dengue mosquitoes sap