-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतात. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या ८ जून २०२५ रोजी भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी ग्रह चंद्र असून हे नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या भाग्यशाली राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळेल आणि अचानक धनलाभही होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, रोहिणी नक्षत्र हे २७ नक्षत्रांपैकी एक असून या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे आणि रास वृषभ आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीसाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल. या काळात तुमच्या कामातील अनेक अडथळे दूर होण्यास मदत होईल. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना सकरात्मक फळ देईल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात मकर राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. जोडीदाराची साथ मिळेल आणि दोघांमधील नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा