-
भारतावर दबाव टाकण्यासाठी चीनने शिनजियांग आणि तिबेट भागात क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सुद्धा आपली अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज ठेवली आहेत.
-
यात ५०० किमी पल्ला असलेले अत्याधुनिक ब्रह्मोस, ८०० किमी रेंज असलेले निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राचा समावेश आहे. त्याशिवाय जमिनीवरुन ४० किलोमीटरपर्यंतच्या हवाई लक्ष्याचा वेध घेणारे आकाश क्षेपणास्त्रही सज्ज आहे. (फोटो सौजन्य – रॉयटर्स)
-
लडाख सीमावादाला सुरुवात झाल्यापासून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने दीर्घ पल्ल्याची सॅम क्षेपणास्त्र तिबेट आणि शिनजियांगमध्ये तैनात केली आहेत. (फोटो सौजन्य – PTI)
-
परिस्थिती चिघळलीच तर चीनला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सुद्धा सुपरसॉनिक ब्रह्मोस, सबसॉनिक निर्भय आणि आकाश क्षेपणास्त्राची तैनाती करुन ठेवली आहे.
-
चीनने फक्त बळकावलेल्या अक्साई चीन भागापुरता सैन्य आणि शस्त्रास्त्रांची तैनाती केलेली नाही, तर काशगर, होतान, ल्हासा आणि नाईंगची सीमेपासून लांब असलेल्या भागातही सैन्य तैनाती केली आहे.
-
हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ३०० किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौका तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टया उद्धवस्त करु शकते.
-
लडाख सेक्टरमध्ये पुरेशा प्रमाणात ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आली आहेत. या क्षेपणास्त्राचे वैशिष्टय म्हणजे सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. त्यामुळे ब्रह्मोसमधून होणारा हल्ला अधिका घातक असेल.
-
मर्यादीत प्रमाणात निर्भय क्षेपणास्त्राचे उत्पादन करुन, ही मिसाइल्स तैनात करण्यात आली आहेत. १ हजार किलोमीटर या क्षेपणास्त्राची रेंज आहे. (फोटो सौजन्य – PTI)
-
निर्भय क्षेपणास्त्र जमिनीपासून १०० मीटर ते चार किलोमीटर अंतरावरुन उड्डाण करुन लक्ष्याचा वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र ३०० किलो वजनाची स्फोटके वाहून नेऊ शकते. (फोटो सौजन्य – एपी)
-
चीनच्या फायटर विमानांचा वेध घेण्यासाठी आकाश क्षेपणास्त्र तैनात केली आहेत. या क्षेपणास्त्र प्रणालीचे जे रडार आहे, ते एकाचवेळी ६४ टार्गेटसचा माग घेऊ शकते.
ब्रह्मोस, निर्भय, आकाश क्रूझ क्षेपणास्त्र सीमेवर सज्ज, ड्रॅगनला त्याच भाषेत देणार प्रत्युत्तर
Web Title: Brahmos akash and nirbhay india rolls out its missiles to counter chinese threat dmp