देशातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये खर्डी तालुका पंढरपूर येथील राहुल अनिल चव्हाण याने 109 वा क्रमांक मिळवून खर्डी, पंढरपूर च्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला आहे. शेतकरी कुटुंबातील राहुल लक्ष्मण चव्हाण याने दुसऱ्या प्रयत्नात १०९ वी रॅँक घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. राहुल यांचे प्राथमिक शिक्षण निकमवस्ती खर्डी तर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण सिताराम महाराज विद्यालय खर्डी आणि सातवी ते दहावी कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण रामचंद्र चव्हाण व नंदा लक्ष्मण चव्हाण या दाम्पत्याचे राहुल हे दुसरे अपत्य. त्यांना एकूण तीन अपत्ये असून, आधुनिक शेतीबरोबर तिन्ही मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिले आहे. थोरला मुलगा कल्याण हा कृषी पदवीधर आहे, तर लहान मुलगी विद्या ही राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रयत्नशील आहे. आई-वडील शेतकरी असताना देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राहूल याने पुणे येथील वाडिया कॉलेजमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. पण शारीरिक तंदुरुस्ती नसल्याने आणि थोड्या तांत्रिक अडचणीमुळे त्याने बारावीनंतर कला शाखेमध्ये पुणे येथे प्रवेश घेतला. तेथील असणाऱ्या युनिक अकॅडमी मध्ये शिक्षण घेऊन दोन वेळा परीक्षा देण्याचा प्रयत्न केला . पूर्वप्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झाला परंतु मुख्य परीक्षेत मुकावे लागले. 2019 -20 साठी घेतलेल्या तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला.देशात 109 वा क्रमांक मिळवल्याने खर्डी येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गगनगिरी नगर येथील त्यांच्या घरी चव्हाण वस्ती येथे विविध मान्यवरांची सत्कारासाठी गर्दी जमली होती. -
यावेळी पंढरपूर तालुक्याचे आमदार प्रशांत परिचारक खर्डी गावचे सरपंच रमेश हाके उपसरपंच प्रणव परिचारक यांनी त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याच वेळेस त्याला शिकवणारे प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी त्याला अनेक शुभाशिर्वाद दिले.
पंढरपुरमधील शेतकऱ्याच्या पोरानं पांग फेडलं; जिल्हा परिषद शाळा ते आयएएस
Web Title: Inspirational success stories pandharpur rahul chavan succuss story nck