पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, दिल्ली येथील सेंटर फॉर चायना अनालिसिस अँड स्ट्रॅटेजी यांच्यातर्फे चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम या विषयावर सामरिक संवाद परिषद आयोजित करण्यात आली आहे. २७ आणि २८ मार्चला विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी ही माहिती दिली. यंदा या परिषदेचे दुसरे वर्ष आहे. चीनच्या जागतिक स्तरावरील वाढत्या विस्तारामुळे राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा परिणामांचे मंथन या परिषदेत होईल. उद्घाटनाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, सेंटर फॉर चायना अनालिसिस अँड स्ट्रॅटेजीचे अध्यक्ष जयदेव रानडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – “राहुल गांधींची मानसिकता राजेशाही-घराणेशाहीची”, भाजपा पधाधिकाऱ्यांची टीका; पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलन

हेही वाचा – शिष्यवृत्तीचे १४ हजार ५७७ अर्ज प्रलंबित

माजी राजदूत गौतम बंबावले, प्रा. दिलीप मोहिते, डॉ. श्रीकांत परांजपे, एअर मार्शल भूषण गोखले, अमेरिकन दूतावासाचे जिम विल्सन, टोकियो येथील इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजिक स्टडीज केंद्राचे डॉ. अकिमोटोदैसुके, प्रा. रॉजर लिऊ, एअर मार्शल एस. एस. सोमण, डॉ. अरविंद कुमार, शेषाद्री चारी, नेपाळचे माजी राजदूत विजय कांत कारणा, सेंटर फॉर चायना अनालिसिसचे नम्रता हासिजा, डॉ. अरूण दळवी, लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस आदी मान्यवर परिषदेतील विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conference on china at pune university in presence of army chief pune print news ccp 14 ssb