पुणे शहरात दिवसभरात ३ हजार १११ करोनाबाधित रुग्ण वाढले असून, १६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या २ लाख ३२ हजार ४९४ झाली आहे. तर आजपर्यंत ५ हजार ३३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान आज १ हजार ९४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर आजअखेर २ लाख ६ हजार ५७२ जण करोनामुक्त झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १ हजार ४३१ तर महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील ११ जण करोनाबाधित रुग्ण आढळले असून, ६२३ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख २० हजार ९४९ वर पोहचली आहे. यापैकी, १ लाख ८ हजार ७६६ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ७१६ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus – राज्यात दिवसभरात ९२ रूग्णांचा मृत्यू , २७ हजार १२६ करोनाबाधित वाढले

राज्यातील करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज वाढणाऱ्या करोनाबाधितांबरोबर आता मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. राज्यात दिवसेंदिवस करोनाची वाढती रूग्ण संख्या पाहून सरकार देखील आता अधिकच कठोरपणे नियमांची अंमलबाजवणी करण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. अनेक शहरांमध्ये तर लॉकडाउनला देखील सुरूवात झालेली आहे. आज दिवसभरात राज्यात ९२ रूग्णांचा मृत्यू झाला असून, २७ हजार १२६ नवीन करोनाबाधित आढळले आहेत.  सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ टक्के आहे.  राज्यात आजपर्यंत ५३ हजार ३०० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus 3 thousand 111 corona patients increased in a day in pune 16 patients died msr 87 svk 88 kjp