पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका नामांकित शाळेतील इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील मुलाने दुसर्‍या वर्गातील मुलाला तिच्यावर बलात्कार आणि खून करण्यासाठी १०० रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार घडला आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड येथील एका नामांकित शाळेतील एका विद्यार्थ्याने प्रगतीपुस्तकावर पालकांची खोटी सही केली. हा प्रकार त्याच्याच वर्गातील मुलीने पाहिला. या प्रकाराबाबत पीडित मुलीने शिक्षकांना सांगितले. शिक्षकांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून त्या मुलाने दुसर्‍या वर्गातील मुलाला तक्रार करणार्‍या मुलीवर बलात्कार कर आणि त्यानंतर तिचा खून करायचा, या कामासाठी तुला १०० रुपये देत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्या मुलाने त्याला बलात्कार आणि खून करण्यासाठी १०० रुपयांची सुपारी दिल्याचे त्याने पीडित मुलीस जाऊन सांगितले. त्यानंतर पीडित मुलीने शाळेतून घरी गेल्यावर कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. त्यावर शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडे संबधित मुलाबाबत तक्रार देण्यास कुटुंबीय गेले. पण उलट पीडित मुलीवर त्यांनी वेगवेगळे आरोप करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. या घडामोडीनंतर पीडित मुलीचे आई वडील आमच्याकडे तक्रार देण्यास आल्यावर संबधित शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. तर या प्रकरणातील मुलास बाल न्याय मंडळासमोर लवकरच हजर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daund taluka school girl rape contract to a student svk 88 ssb