सीईटीच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत मुदत

राज्य सीईटी सेलमार्फत पदवी आणि पदव्युत्तर पदी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाते.

(संग्रहीत छायाचित्र)

पुणे : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या एमएचटी-सीईटीच्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विद्यार्थ्यांना संधी दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात ३० जूनपर्यंत दुरुस्ती करता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सीईटी सेलमार्फत पदवी आणि पदव्युत्तर पदी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाते. त्यात एमएचटी-सीईटीसाठी ६ लाख ६ हजार १४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र अर्ज करताना विद्यार्थ्याकडून नाव, जन्मतारीख, छायाचित्र, स्वाक्षरी, विषय गट निवडताना अनावधानाने चुका झाल्या आहेत. त्यामुळे चुकांच्या दुरुस्तीची संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून अर्जात दुरुस्ती करण्यासाठी संधी देण्याचा निर्णय राज्य सीईटी सेलने घेतला. त्यानुसार विद्यार्थ्यांना स्वत:च्या लॉग इनमधून अर्जात ३० जूनपर्यंत बदल करता येईल, अशी माहिती राज्य सीईटी सेलने दिली. तसेच उच्च शिक्षण विभागाच्या आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीच्या अर्जातही दुरुस्त करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. या विद्यार्थ्यांनाही २९ जूनपर्यंत आणि ६ ते ११ जुलै या कालावधीत अर्जात दुरुस्त करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deadline for students to amend the cet application till june 30 pune print news zws

Next Story
अपुऱ्या, अनियमित व गढूळ पाण्यामुळे पिंपरीतील नागरिक हैराण ; टँकरने पाणी आणण्यासाठी लाखो रूपयांचा भुर्दंड
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी