इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून एका अभियंत्याने उडी मारून आत्महत्या केली आहे. जिशन नासीर शेख (वय वर्ष २७ रा.काटे पुरम चौक फेस २, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार जिशन शेख हा पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात राहत होता. त्याने मध्यरात्री साडे बारा वाजता राहत्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ११ व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी जिशन शेख याला मृत घोषित केले. अद्याप आत्महत्याचे कारण समजले नाही. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineer commits suicide in pune