जुन्या काळातील वाफेचे इंजिन असलेल्या रेल्वे प्रतिकृतीसह इंग्लंड आणि अमेरिका बनावटीची एक्सप्रेस रेल्वेची प्रतिकृती चार वर्षांनंतर दीक्षित यांच्या रेल्वे प्रदर्शनामध्ये धावणार आहे. नारायण पेठ येथील केळकर रस्त्यावरील सुहास दीक्षित यांच्या निवासस्थानी येत्या शुक्रवारपासून (३१ ऑक्टोबर) हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबपर्यंत दररोज सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
या प्रदर्शनामध्ये एक्सप्रेस रेल्वे, गुड्स रेल्वे, स्टीम इंजिन, डिझेल इंजिन, इलेक्ट्रिक इंजिन अशा प्रतिकृतींचा समावेश आहे. मुलांना वेड लावणाऱ्या या प्रदर्शनात विविध रेल्वे प्रतिकृतींबरोबरच डोंगर, बोगदे, पूल, वॉशिंग साइिडग, लोको शेड, प्लॅटफॉर्मवरचे हलते-चालते प्रवासी, तसेच हाताने बनविलेले रस्ते, रस्त्यावरचे दिवे, सिग्नल सिस्टिम यांचा समावेश आहे. या सर्व गोष्टींचा योग्य असा परिणाम साधण्यासाठी विशेष श्राव्य सादरीकरणाचीही जोड देण्यात आली आहे. ज्यामुळे एकूणच रेल्वे प्रवासाची अनुभूती प्रेक्षकांना मिळणार आहे. या प्रदर्शनातील प्रत्येक खेळ १५ मिनिटांचा असून विद्यार्थी, पालक आणि रेल्वेप्रेमींनी आवर्जून त्याचा लाभ घेतलाच पाहिजे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी सुहास दीक्षित यांच्याशी ९९२३३६७३८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England america make rly model in dixit rly exhibition