पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरात सोमवारी मध्यरात्री अनिकेत जाधव या तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत जाधव हा रावण सेना या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख होता. रावेत, आकुर्डी या परिसरात टोळीची दहशत होती. सोमवारी मध्यरात्री आकुर्डी येथील शीतलादेवी मंदिराजवळ हा प्रकार घडला. काही अज्ञात लोकांनी अनिकेत जाधव याच्या डोक्यात दगड आणि कोयत्याचे वार घरून त्याला ठार मारले. या घटनेनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री चार ते पाच जणांच्या टोळक्याने अनिकेत वर दगडाने आणि कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. ही हत्या पूर्ववैनस्यातून झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय पळसुले यांनी दिली. अनिकेतवर अनेक गुन्हे दाखल आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिनाभारापूर्वी त्याने आकुर्डीच्या रमाबाई वसाहतीमध्ये महाकाली टोळीचा प्रमुख हनम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर अनिकेत जाधव फरार होता. मात्र, काल रात्री अचानकपणे त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यामुळे या हल्ल्यामागे महाकाली टोळीचा हात असावा, असा पोलिसांनी संशय आहे. सध्या निगडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangwar in pune ravan sena aniket jadhav murder by mahakali gang