पिंपरी: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायट्यांचा मेळावा होणार आहे. सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर या ठिकाणी चर्चा होणार असून त्या सोडवण्याचे प्रयत्न पवारांच्या माध्यमातून केले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व थेरगावचे माजी नगरसेवक संतोष बारणे, माया बारणे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात ५ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता हा मेळावा होणार आहे.अजित गव्हाणे म्हणाले की, शहरातील विविध सोसायटीधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून केला जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Housing society in pimpri chinchwad conference in thergaon in presence of ajit pawar print news zws