स्वारगेट भागातील घटना

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : शंकरशेठ रस्ता भागातील एका शाळेच्या आवारात मानवी शरीराचा अवशेष सापडल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. शाळेच्या आवारात खेळणाऱ्या मुलांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षकांना या प्रकाराची माहिती दिली. शंकरशेठ रस्त्यावरील एका शाळेच्या आवारात दुपारी मुले खेळत होती. मैदानापासून काही अंतरावर झाडाजवळ मानवी शरीराचा अवशेष विद्यार्थ्यांना आढळून आला. घाबरलेल्या मुलांनी त्वरित या घटनेची माहिती शिक्षकांना दिली. त्यानंतर शिक्षकांनी या घटनेची माहिती स्वारगेट पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक  कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. मानवी शरीराचा अवशेष पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human body part found in the school premises zws