राज्यातील सर्व सहकारी संस्थांची माहिती नागरिकांना ऑनलाईन पाहता यावी तसेच शासनाच्या सूचना व नियमांची माहिती आणि कायद्यांतील बदल या संस्थांपर्यंत पोहोचावी यासाठी संस्थांनी आपली माहिती ऑनलाईन भरण्याचे आवाहन, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे संचालक व कायदे सल्लागार अॅड. जयंत कुलकर्णी यांनी केले आहे.
राज्यातील सर्व सहकारी आणि गृहनिर्माण संस्थांनी आपला ई-मेल आयडी तयार करणे, तसेच सरकारच्या http://www.mahasahakar.mah.gov.in या किंवा http://www.sahakarayukta.mah.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्यावरील ‘यूझर मॅन्युअल’मधील ‘सोसायटी रजिस्ट्रेशन मॉडय़ुल’वर क्लिक करून संस्थेची माहिती विहित नमुन्यात भरणे याद्वारे माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देता येणार आहे. ही माहिती ऑनलाईन भरून पाठवल्यानंतर माहितीची छापील प्रत (प्रिंट आऊट) सहकार आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित उपनिबंधक कार्यालयात पाठवायची आहे.
राज्यात सुमारे दोन लाख पंचवीस हजार नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत. महासंघातर्फे या सुविधेच्या प्रचारासाठी विभागीय मेळावे घेण्यात येत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jul 2013 रोजी प्रकाशित
सहकारी व गृहनिर्माण संस्थांनी ऑनलाईन माहिती भरावी- अॅड. जयंत कुलकर्णी
सहकारी संस्थांची माहिती नागरिकांना ऑनलाईन पाहता यावी, शासनाच्या सूचना व नियमांची माहिती आणि कायद्यांतील बदल या संस्थांपर्यंत पोहोचावी यासाठी संस्थांनी आपली माहिती ऑनलाईन भरावी.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 17-07-2013 at 02:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information of coop and housing soc should be online adv jayant kulkarni