पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये पिस्तूलाचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेला आरोपीने व्याजाने एक लाख रुपये दिले होते. त्यापोटी आरोपीने शरीरसुखाची मागणी केली. मात्र पीडित महिलेने त्याच्या या मागणीला नकार दिला असता पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार करून त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आले, अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी किरण घारेसह दीपक ओसवालला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पीडित महिलेने ४० वर्षीय किरणकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात या महिलेने पन्नास हजारांचे दोन धनादेश किरणला दिले होते. मात्र, किरणने व्याजाच्या बदल्यात पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यास महिलेने नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या किरणने नवरा आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने महिलेला फर्च्युनर गाडीमध्ये बसवून पिस्तूलाचा धाक दाखवत बलात्कार केला असं महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. बलात्कार करतानाचे चित्रीकरण मोबाईमध्ये करून ब्लॅकमेल करत अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी महिलेवर बलात्कार केल्याचं महिलेने पोलिसांनी सांगितले आहे. शिवाय, पोलिसात गेलीस तरी मला कोणी काहीही करु शकत नाही असा दम महिलेला आरोपीने दिला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी किरणबरोबरच ४६ वर्षीय दीपकलाही यअटक करण्यात आली आहे. अधिक तपास तळेगाव पोलीस करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man rape women after she refuse to give sexual favor in terms of loan interest kjp scsg