वेगाने धावणाऱ्या बसच्या चालकाला हृहयविकाराचा झटका आल्याने त्याचा बसमध्येच मृत्यू झाला. या कालावधीत ही बस एका रिक्षाला धडकल्याने त्यातील चालकासह पाच जण गंभीर जखमी झाले. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास हडपसरमधील ससाणेनगर भागात ही घटना घडली.
महमद शरीफ शेख (वय ५०, रा. नाना पेठ) असे मृत्यू झालेल्या बसचालकाचे नाव आहे. नूरमहंमद देशमुख (वय ४५, रा. महमदवाडी, हडपसर), भाऊसाहेब भोसले (वय ५०, रा. हरिहरेश्वरनगर, महमदवाडी), अभिषेक नाईक (वय १६, रा. महमदवाडी), शबीर अमिनसाब शेख (वय ७१) व रिक्षा चालक अनिस मन्सूर (वय ३५, रा. हडपसर) हे गंभीर जखमी झाले आहेत.
ससाणेनगर रस्त्यावरून ही बस वेगात येत होती. बस चालवीत असतानाच चालकाला हृदयविकाराचा झटका आहे. त्यामुळे बसवरील ताबा सुटला. त्यानंतर ही बस थेट रिक्षावर जाऊन आदळली. रिक्षामध्ये चालक व चार प्रवासी बसले होते. या घटनेत ते जखमी झाले. त्यानंतर एका झाडाला धडकून बस थांबली. त्यापूर्वीच बसचालकाचा मृत्यू झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One dead five injured in an accident in sasane nagar