बालेवाडी क्रीडा संकुलनातील सात जनरेटर चोरून नेणाऱ्या तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
प्रदीप नवरंग ठाकूर (वय २१ ), रोहित गुलाब पठाण (वय १८, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी), सोमनाथ नवलू अवघडे (वय २३, रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी यापैकी एक जनरेटर जप्त केला आहे. क्रीडा संकुलनाचे उपसंचालक जनक श्रीरंगराव टेकाळे (वय ५२, रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१२ ते २०१३ दरम्यान ही चोरीची घटना घडली. गेल्या वर्षी तपासणी केल्यानंतर यंदा पुन्हा तपासणी करताना सात जनरेटर चोरीला गेल्याचे दिसून आले. याचा तपास करत असताना पोलिसांना प्रदीप ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या दुकानात एक जनरेटर मिळून आला. त्यावरून तपास करून तिघांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery of 7 generators from balewadi sports complex