वानवडी येथील काळेपडळ येथे ६ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. काळेपडळ भागात बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीवर पीडितेच्या वडिलांसोबत काम करणाऱ्या २६ वर्षीय नराधमाने चिमुरडीवर बलात्कार केला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील काळेपडळ या भागात इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या  बांधकामाच्या ठिकाणी पीडित चिमुरडीचे वडील आणि आरोपी चश्मू उर्फ सदेर मंहमद उमर खान दोघे जण एकत्र काम करत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या ओळखीचा फायदा घेत रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी पीडीतेला खेळायला म्हणून बाहेर घेऊन आला. बराचवेळ मुलगी आली नाही, त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी चिमुरडी इमारतीच्या टेरिसवर सापडली. त्यानंतर चिमुरडीवर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून पुढील तपास सुरु आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six year old girl rape case in pune police arrested accused