पेपरटेल्स या हॅण्डमेड पेपर इन्स्टिटय़ूटतर्फे (एचएमपीआय) शिवाजीनगर येथे हॅण्डमेड कागदावर काढलेली चित्रे आणि हस्तकलेचे नमुने प्रदर्शित करण्यासाठी विशेष कलादालन आणि शोरुम सुरू करण्यात आली आहे. कलाकृतींचे प्रदर्शन आणि हॅण्डमेड कागदाचा व्यवसाय अशा दुहेरी उद्देशाने हे कलादालन आणि शोरुम सुरू करण्यात आली आहे.
कलादालनाचे उद्घाटन १ जून रोजी होणार आहे. या कलादालन आणि शोरुममध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या सर्व वस्तू हॅण्डमेड कागदाच्या आहेत. तसेच त्याचे छत आणि भिंतीदेखील हॅण्डमेड कागदाच्या लगद्यापासून बनवल्या आहेत. कलादालनाच्या अंतर्गत सजावटीसाठी नैसर्गिक घटक वापरण्यात आले आहेत. कलादालनाचा वापर विविध प्रकारच्या कार्यशाळा घेण्यासाठीही केला जाणार आहे. ड्रॉईंग पेपर, हर्बेरियम पेपर, डेकल एज पेपर, विविध प्रकारचे मोटेल पेपर आणि अनेक प्रकारचे फॅन्सी कागदांची शोरुमच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special art gallery for artistic work from handmade paper