पुण्यातील कात्रज बोगद्यापुढे असलेल्या वेळू फाटा या भागात एका ऑईल कंपनीत स्फोट झाला. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. राजिंदर प्रसाद (वय २६) आणि विकास सिंग (वय ३६) अशी या दोघांची नावं आहेत. अग्निशमन दलाने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कात्रज बोगद्यापुढे वेळू फाटा येथील ससेवाडीमधील एका ऑईल कंपनीत आज सकाळी साडेदहाच्या सुमारास स्फोट झाला. त्यावेळी कंपनीमध्ये राजिंदर प्रसाद आणि विकास सिंग हे दोघे वेल्डिंगचे काम करीत होते. त्या स्फोटात दोघे गंभीर जखमी झाले. त्या दोघांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले. तर ही आग तासाभरात आटोक्यात आणण्यात यश आले असून नेमका स्फोट कशामुळे झाला आहे. याबाबतचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two death in blast in oil company pune scj