चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत चोरट्याला दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहन उर्फ लोकेश दत्ता धावडे (वय २७, रा. पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक हडपसर भागात गस्त घालत होते. हडपसरमधील गाडीतळ परिसरात एकजण थांबला असून त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून धावडेला पकडले. चौकशीत त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे निषन्न झाले. धावडेने हडपसर, विश्रांतवाडी तसेच सातारा जिल्ह्यातील शिरवळ भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर, उपनिरीक्षक गुंगा जगताप, उदय काळभोर, सुदेश सकपाळ, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two wheeler thief caught in pune three bikes seized pune print news msr