सोशल मीडियावर सतत चर्चेत राहणारी उर्फी जावेद हिच्या तोकडया कपड्यावरून भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भूमिका मांडली. त्यावरुन दोघींमध्ये चांगलाच वाद पाहण्यास मिळाला. त्याच दरम्यान आज पुण्यात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यावेळी उर्फी जावेद बद्दल प्रश्न विचारला असता.त्या म्हणाल्या की,माझा विरोध हा कोणत्या महिला किंवा तिच्या धर्माला नव्हता आणि नाहीच.तो तिच्या विकृतीला आहे.तसेच तुम्ही तिच कधी तरी कौतुक केल पाहिजे.कारण सध्या ती महिला पूर्ण कपड्यामध्ये दिसत आहे.त्यामुळे सारख सारख असू बोलू नका.कोणी तरी सुधारत असून आपण त्याच कौतुक देखील केल पाहिजे.आता तिने काही तरी ठरवल असेल,ती सध्या चांगल्या कपड्यामध्ये दिसत आहे.त्याचे अनेक फोटो मला अनेक जण शेअर करीत आहेत.त्यामुळे आपल तेवढच म्हणण आहे की चांगल कपडे घाल आणि फिर अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed was praised by chitra wagh svk 88 amy